विकासकामे मार्गी लागणार

वसई: वसई विरार महापालिकेला अखेर तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळणार आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यात धुळे जिल्हय़ातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल
All three parties in mahayuti are fighting for Nashik Lok Sabha seat
भुजबळ मुंबईत तर, गोडसे दिल्लीत… इच्छुकांची पडद्याआडून मोर्चेबांधणी
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

वसई विरार महापालिकेचे आयुक्त बी.जी. पवार डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर आयुक्त मिळाले नव्हते. वसई विरार महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार पालघर जिल्ह्यचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने विकास कामांवर परिणाम होत होता शिवाय धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. मार्च महिन्यात धुळ्याचे जिल्हाधिकारी असलेले सनदी अधिकारी डी. गंगाथरन यांची वसई विरारच्या आयमुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र धुळ्याची निवडणूक असल्याने त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा वसई विरारचे आयुक्तपद रिक्त होते. दरम्यान करोनाचे संकट वाढल्याने जिल्हाधिकार्म्यांवर ताण वाढला होता. जिल्हा आणि वसई विरार शहराकडे लक्ष देताना त्यांची तारेवरची कसरत होत होती.

मंगळवारी मुख्यमंत्र्यानी तातडीने वसई-विरार महापालिकेचे रिक्त असलेले आयुक्तपद भरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा डी गंगाथरन यांची नियुक्ती केली. सध्या पालिकेकडे केवळ दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. आता आयुक्त आल्याने करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेला मोठी मदत मिळणार आहे.