20 September 2018

News Flash

प्राचीन चोरवाटेचा छडा

लेण्यांमधील गुहेत एकावेळी शंभर-दीडशेजण सहजपणे राहू शकतात.  

गणेश गडद लेण्यांचा प्रवास आता सोपा

HOT DEALS
  • Jivi Energy E12 8 GB (White)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%
  • Vivo V7+ 64 GB (Gold)
    ₹ 16990 MRP ₹ 22990 -26%
    ₹900 Cashback

मुरबाड तालुक्यातील प्राचीन गणेश गडद लेणी परिसरात राबविण्यात आलेल्या एका मोहिमेत लेण्यांकडे जाणारी प्राचीन वाट सापडली आहे. त्यामुळे लेण्यांकडे जाण्याचा मार्ग सोपा, सुरक्षित होणार असल्याचे इतिहास संशोधक अविनाश हरड यांनी सांगितले.

अश्वमेध प्रतिष्ठान, गणेश-गडद ट्रस्ट आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे नुकतीच लेण्यांकडे जाणाऱ्या वाटेवर स्वच्छता मोहीम राबवली. मुरबाडपासून साधारण ३५ किलोमीटरवर डोंगरात सातव्या-आठव्या शतकात खोदलेली लेणी आहेत. काही महिन्यांपूर्वी वन विभागाने डोंगरातील एका बारमाही झऱ्यावर नळपाणी योजना राबवून ते पाणी थेट लेण्यांमधील टाकीत आणले आहे. तसेच सौरदिवे लावण्यात आले आहेत. लेण्यांमधील गुहेत एकावेळी शंभर-दीडशेजण सहजपणे राहू शकतात.

पायथ्याच्या सोनावळे गावापासून लेणी साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर आहेत. घनदाट जंगल आणि चढणीचा मार्ग यामुळे इथे येईपर्यंत पर्यटक थकतात. लेण्यांकडे जाणाऱ्या वाटेवरील शेवटचा टप्पा फारच खडतर आणि दमविणारा आहे. मात्र स्वच्छता मोहीमेदरम्यान सापडलेल्या प्राचीन वाटेमुळे पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. कारण त्यामुळे लेण्यांकडे जाणे अधिक सोपे होणार आहेच, शिवाय या वाटेला कठडा असल्याने येथील प्रवास अधिक सुरक्षितही ठरेल, असे या मोहिमेचे नेतृत्त्व करणारे अश्वमेध प्रतिष्ठानचे समीर पाटील यांनी सांगितले.

लेण्यांकडे जाणारी प्राचीन वाट सापडल्याने आमचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे लवकरच अशा प्रकारची आणखी एक मोहीम राबवून सापडलेल्या या नव्या वाटेवरील अडथळे दूर केले जातील. त्यानंतर ही वाट पर्यटकांना खुली केली जाईल.

अविनाश हरड, अश्वमेध प्रतिष्ठान.

First Published on January 12, 2018 2:34 am

Web Title: ganpati gadad caves