किरकोळ बाजारात १६० रुपये किलोवर दर

लोकसत्ता प्रतिनिधी

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

ठाणे : स्वयंपाक करताना फोडणीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या लसणाची आता १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्यावर्षी हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लसणाच्या पिकाचे नुकसान झाले असून यामुळे लसणाची आवक आता घटल्याने त्याचे दर वधारल्याचे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक मुख्यत्वे करून नाशिक, पुणे राजस्थान आणि मध्य प्रदेशातून होते. लसणाच्या फोडणीशिवाय कोणताही पदार्थ होणे शक्य नसल्याने लसणाला बाजारात मोठय़ाप्रमाणात मागणी असते. दोन आठवडय़ांपूर्वी घाऊक बाजारात ८५ रुपये किलो दराने लसणाची विक्री केली जात होती, तर  सद्य:स्थितीला १०० रुपये प्रति किलो दराने लसणाची विक्री केली जात आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात होता. मात्र घाऊक बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो ४० रुपयांनी वाढले आहेत.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन आठवडय़ांपूर्वी १ हजार १५९ क्विंटल इतकी लसणाची आवक होत होती. मात्र सध्या २८८ क्विंटल ते १ हजार २६ क्विंटल इतकीच लसणाची आवक होत आहे.

बाजारात लसणाची आवक कमी असल्याचे कारण सांगून किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूटमार सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी हिवाळ्यात अवकाळी पाऊस झाला. त्याचा फटका लसणाच्या पिकांना बसून त्याची आवक घटली. परिणामी त्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लसणाची बाजारात आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. ही आवक अशीच राहिली तर, येत्या काळात लसणाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

– राजेश तांबटकर, लसूण विक्रेते