ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या माíगकेचा पेच सुटणार; १७ डिसेंबर रोजी आदेश निघण्याची शक्यता
मध्य रेल्वेवरील उपनगरीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या-सहाव्या माíगकेच्या प्रकल्पाला ठाणे-दिवा या स्थानकांदरम्यान गती मिळणार आहे. या प्रकल्पाआड येणारी १४७ झाडे तोडण्यास परवानगी मिळाली असून त्याचे आदेश १७ डिसेंबर रोजी निघण्याची शक्यता आहे. परिणामी हा प्रकल्प डिसेंबर २०१७पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या दरम्यान पाचव्या-सहाव्या माíगका उभारण्याचा प्रकल्प एमयूटीपी-२ या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प चार टप्प्यांत होणार असून त्यापकी कुर्ला-ठाणे आणि दिवा-कल्याण या दोन टप्प्यांतील काम पूर्ण झाले आहे; तर ठाणे-दिवा या दरम्यानचे काम गेली काही वष्रे सुरू आहे. मात्र, सीएसटी-कुर्ला या कामाची सुरुवात झालेली नाही.
ठाणे-दिवा या दरम्यान पाचवी-सहावी माíगका टाकण्यात स्थानिकांच्या अडथळ्यापासून अनेक समस्या उद्भवल्या आहेत. सुरुवातीला दोन बोगदे उभारावे लागणार असल्याने हा प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यापकी एक बोगदा कधीच तयार झाला असून दुसऱ्या बोगद्याचे कामही जोरात सुरू आहे. त्यानंतर या मार्गात १४७ झाडांचा अडथळा येत असून ती तोडण्यासाठी ठाणे महापालिकेची परवानगी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या बठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्या वेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी या १४७ झाडांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. ही झाडे कापणे आवश्यक असल्याचे सांगत विचारे यांनी याबाबतचा निर्णय १७ डिसेंबरला होण्याची शक्यता व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाला कामे पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी मदत करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही झाडे बाजूला केल्यानंतर पाचव्या-सहाव्या माíगकेसाठी उर्वरित आवश्यक कामे लवकरात लवकरात पूर्ण केली जातील. याच दरम्यान दिवा स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पाचव्या-सहाव्या माíगकेचा पूर्णपणे वापर करणे शक्य होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.