आदिवासी पाड्यात लसीकरण वाढवण्यासाठी शक्कल; सात पाड्यांमध्ये लसीकरणास अल्प प्रतिसाद

ठाणे : येऊर क्षेत्रातील आदिवासी पाड्यातील नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून पुढे यावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ‘लस घ्या धान्य मिळवा’ अशी नवी शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. येथील सात आदिवासी पाड्यांमधील रहिवाशी करोना प्रतिबंधक लसीकरणाला फारसा प्रतिसाद देत नसल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यास १५ दिवस पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे.

येऊर गावात एकूण सात आदिवासी पाडे आहेत. करोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेमार्फत गावातील आरोग्य केंद्रावर ४ जूनपासून लसीकरण मोहीम राबविण्यास सुरू करण्यात आली आहे. गावात दोन ते अडीच हजार नागरिक हे ४५ वर्षांपुढील आहेत. या नागरिकांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी पूर्णपणे सजगता निर्माण झाली नसल्यामुळे येथील नागरिकांचा लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यातील दोन दिवस लसीकरण होत असतानाही या परिसरात ४५ वर्षांपुढील केवळ ७९ जणांचेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरणातील सहभाग वाढवण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न चालवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘लस घ्या धान्य मिळेल’ हा उपक्रम येथे राबविण्यात येत असून या उपक्रमाला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

 

करोना प्रतिबंधक लशीमुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे लाभार्थी नागरिकांनी गैरसमज दूर करून लवकरात लवकर लस घ्यावी. – डॉ. वर्षा ससाणे, वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका.

 

या गावातील नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून पुढे यावे यासाठी लस घेणाऱ्यास, धान्य मिळेल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला महिलावर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  – परिषा सरनाईक, नगरसेविका