करोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिरसरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवरील एक हॉटेल मीरा-भाईंदर महापालिकेने रविवारी सील केलं. या हॉटेलमध्ये काम करणारे ९१ पैकी २१ कर्मचारी करोनाबाधित आढळून आले. या हॉटेलमध्ये मोठया प्रमाणावर ग्राहकांची उठबस होती.

हॉटेलच्या व्यवस्थापनानेच खबरदारी म्हणून हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली व जो रिपोर्ट् आला, त्याची महापालिका प्रशासनाला माहिती दिली. मीरा-भाईंदर महापालिकेने या परिसरात चाचणी केल्यानंतर आणखी सहाजणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस

आणखी वाचा- मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार

मागच्या काही दिवसात या हॉटेलमध्ये आलेल्यांना शोधून काढणे, महापालिकेसमोर एक मोठे आव्हान आहे. रविवारी मीरा-भाईंदर महापालिकेने चार मार्चपर्यंत हे हॉटेल सील केलं. आणखी ३८ कर्मचाऱ्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवून देण्यात आले आहे.

आणखी वाचा- महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती; उदय सामंत यांची माहिती

शनिवारी मीरा-भाईंदरमध्ये ६५ नवे करोना रुग्ण आढळले. यात हॉटेलमधल्या २१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागच्या काही दिवसात सर्वाधिक करोना रुग्ण सापडण्याची या भागातील ही पहिली घटना आहे. याआधी दर दिवशी मीरा-भाईंदरमध्ये सरासरी १० ते २० करोना रुग्णांची नोंद होत होती.

“सर्व पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना दहीसर चेक नाका येथील कोविड केंद्रात दाखल केले आहे. त्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. मागच्या आठवड्यात या हॉटेलमध्ये कोणी मुक्काम केला, त्याची माहिती आम्ही घेत आहोत. जे ग्राहक फक्त लंचसाठी आले, त्यांना शोधून काढणे कठिण आहे” असे आरोग्य खात्याचे नोडल अधिकारी डॉ. संतोष पांडे यांनी सांगितले.