28 May 2020

News Flash

गुड न्यूज: पत्री पुलाचे गर्डर अखेर कल्याणमध्ये दाखल

आता तरी पत्री पूल लवकर पूर्ण करावा अशी मागणी केली जाते आहे

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्री पुलाचे गर्डर कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. आता तरी पूल लवकरात लवकर पूर्ण करा आणि वाहतूक कोंडीतून आमची सुटका करा अशी मागणी प्रवासी करत आहेत. पत्री पुलासाठीचे सात गर्डर कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. पत्री पूल बंद असल्याचा फटका गेल्या १९ महिन्यांपासून बसतो आहे. त्यामुळे एकाच पुलावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीचा ताण येतो आणि प्रचंड वाहतूक कोंडी होते. पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी कधी कधी एक तासही लागतो इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गर्डर आल्याने कल्याणकर आनंदले आहेत. आता तरी पत्री पूल लवकरात लवकर बांधा अशी मागणी केली जाते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 8:10 pm

Web Title: girders now in kalyan for patri bridge good news for kalyan citizens scj 81
Next Stories
1 पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व
2 मध्यवर्ती ठाण्यातील कॅमेरे बंद?
3 तरणतलावांच्या दुकानदारीला चाप
Just Now!
X