News Flash

बिबटय़ाच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

कसारा येथील डोईपाडा गावात बिबटय़ाच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कसारा येथील डोईपाडा गावात बिबटय़ाच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बिबटय़ाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मुलीचे नाव दीपाली भगत असे आहे. दीपाली आईसह घरात झोपलेली असताना पहाटे पाचच्या सुमारास बिबटय़ाने तिला घरातून ओढत जंगलात नेले, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर जंगलात दीपालीचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी दीपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुलीच्या घरच्यांना तातडीने वीस हजार रुपयांची मदत दिली, तर दोन दिवसांत दीपालीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 12:50 am

Web Title: girl die in leopard attack
टॅग : Attack,Leopard
Next Stories
1 सत्तेसाठी युद्धही घडवतील!
2 दुष्काळ जाहीर नाही, मग कर कसा?
3 निवडणुकीच्या रणधुमाळीत खारफुटींची बेसुमार कत्तल
Just Now!
X