31 May 2020

News Flash

डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

जीवघेण्या गर्दीचा आणखी एक बळी

डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चार्मी प्रसाद असं या मृत तरुणीचं नाव आहे. आज सकाळी ८.५३ ची लोकल चार्मीने पकडली होती. मात्र प्रचंड गर्दीमुळे आत न जाता आल्याने चार्मी बाहेर लटकून राहिली आणि कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन पडली. याच घटनेत तिचा मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा लोकसभेत मांडला होता. आता डोंबिवलीच्या गर्दीने आणखी एक बळी घेतला आहे.

गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून चार्मी पसाद या तरुणीचं नाव होतं. ती डोंबिवलीची रहिवासी होती. आज सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांची लोकल चार्मीने डोंबिवली स्थानकातून पकडली. मात्र तिला आत शिरता न आल्याने बाहेर लटकावे लागले. बाहेर लटकून प्रवास करत असताना तिचा तोल गेला आणि डोंबिवलीच्या पुढेच असलेल्या कोपर स्टेशनजवळ ती पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2019 3:36 pm

Web Title: girl fall from local train and dead at koper station scj 81
Next Stories
1 उन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर!
2 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का
3 गुडवीन ज्वेलर्सकडून फसवणूक; दोन जण अटकेत
Just Now!
X