बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडत असताना कर्जत दिशेने येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. त्या तरूणीची प्रकृती गंभीर असून तिला सध्या मुंबईतील जे.जे. रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी रेल्वे पोलिसांची मदत घेत या तरूणीला बदलापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या तरूणीची अद्याप ओळख पटली नसून तिला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथेही उपचार न झाल्याने नंतर मुंबईतील जे.जे. रूग्णालयात हलविण्यात आले आहे.