X
X

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

READ IN APP

या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील गोवेगाव येथे राहणाऱ्या रविकांत रमेश राम (२२) या युवकाने घरकाम करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवेगाव येथील अशोक पाटील चाळ येथे राहणाऱ्या रविकांत याने घरकाम करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते व तिच्याशी या वर्षीच्या जुलै महिन्यात संबंध ठेवले होते. मात्र त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करीत या तरुणीची फसवणूक केली.

22

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X