लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षांपासून तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ३० वर्षीय तरुणाला अखेर शनिवारी ठाण्यात त्याच तरुणीशी लग्न करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाग पाडले.
खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या संबंधित तरुणाचा दुसऱ्याच तरुणीशी साखरपुडा होऊन ३० मे रोजी विवाह होणार होता.   पीडित तरुणीला ते समजले. तिने आक्रमक होत त्याचा हा डाव उधळून लावला.  कार्यकर्त्यांनी पीडित तरुणीशी त्याचे लग्न लावून दिले. लग्नाला नकार दिल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याची तंबी या तरुणीने त्याला दिली होती. त्यानंतर तो ताळ्यावर आला. यापूर्वीही त्याने एकदा दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा घाट घातला होता.