29 October 2020

News Flash

धान्याचा अवैद्य साठा करताना बोईसर मध्ये ट्रक पकडला

धान्य साठा करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे.

पालघर: बोईसर मध्ये १९ टन तांदूळ ट्रक मधून उतरवला जात असताना पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी पाहिल्यानंतर बोईसर येथे अवैद्य पद्धतीने धान्य साठा करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे.

बोईसर काटकरपाडा भागात मदत कार्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे व त्यांचे सहकारी जात असताना सेवाश्रम शाळेजवळ एका वाहनातून धान्य उतरवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा ट्रक आंध्र प्रदेशातून तांदूळ भरून निघाल्याचे तसेच डहाणू येथे एका व्यापाऱ्याकडे जाण्याबाबतची कागदपत्र असताना बोईसर येथे हे धान्य उतरवले जात होते. संबंधित व्यक्तीकडे धान्य साठा करण्यासाठी आवश्यक कोणतेही कागदपत्र नसल्याचे तसेच घरामध्येच असलेल्या गोडउनमध्ये गहू व इतर धान्य असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील कारवाई करण्याचे सुचित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 5:56 pm

Web Title: grain illegible in boiser caught truck nck 90
Next Stories
1 ठाणे जिल्ह्य़ात दोन दिवसांत आणखी २६ रुग्ण
2 Coronavirus: शहापूरमध्ये ३८ प्रवासी होम क्वारंटाइन; तालुक्यात भीतीचे वातावरण
3 राज्यात धान्याचा तुटवडा!
Just Now!
X