पालघर: बोईसर मध्ये १९ टन तांदूळ ट्रक मधून उतरवला जात असताना पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी पाहिल्यानंतर बोईसर येथे अवैद्य पद्धतीने धान्य साठा करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईसर काटकरपाडा भागात मदत कार्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे व त्यांचे सहकारी जात असताना सेवाश्रम शाळेजवळ एका वाहनातून धान्य उतरवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा ट्रक आंध्र प्रदेशातून तांदूळ भरून निघाल्याचे तसेच डहाणू येथे एका व्यापाऱ्याकडे जाण्याबाबतची कागदपत्र असताना बोईसर येथे हे धान्य उतरवले जात होते. संबंधित व्यक्तीकडे धान्य साठा करण्यासाठी आवश्यक कोणतेही कागदपत्र नसल्याचे तसेच घरामध्येच असलेल्या गोडउनमध्ये गहू व इतर धान्य असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील कारवाई करण्याचे सुचित केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grain illegible in boiser caught truck nck
First published on: 04-04-2020 at 17:56 IST