दहावीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांची प्रवेशासाठीची धावपळ सुरू झाली आहे. ठाणे परिसरातील मागील वर्षांच्या कट ऑफ लिस्ट पाहिल्यास ठाण्याच्या वेशीवरील गुणवत्ता मोठी असल्याचे दिसून येत आहे. मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालय, उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय आणि कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्ट ९० टक्क्य़ांहून अधिक आहे, तर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाची कॉमर्स शाखेची गुणवत्ता यादी ९१ टक्के होती, तर वझे-केळकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची कट ऑफ लिस्ट ९० टक्क्य़ांवर आहे. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची कट ऑफ लिस्ट ८७ टक्के इतकी आहे, तर कला शाखेची सर्वाधिक मोठी कट ऑफ लिस्ट वझे केळकर महाविद्यालय ७५ टक्के, कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची ७४ टक्के इतकी होती. कला विभागाच्या मराठी माध्यमाची कट ऑफ लिस्ट डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाची ५७ टक्के इतकी आहे. एकूण विद्यार्थिसंख्येचा विचार करता ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात वाणिज्य शाखेची क्षमता १२०० इतकी आहे, तर बिर्ला महाविद्यालयाची वाणिज्य आणि विज्ञान शाखेची क्षमता ७२० आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालयाची कला विभागाची क्षमता ३६०, तर वाणिज्य विभागाची क्षमता ६०० इतकी आहे. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाची एकूण विद्यार्थिसंख्या ४८० इतकी आहे.
student-1
studentt2