वसईत ‘ग्रेटर फ्लेमिंगो’चे अवकाळी आगमन; पक्षीप्रेमींची गर्दी

वसईतील मिठागरांत मोठय़ा संख्येने ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ अर्थात मोठय़ा रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. वसईतील गोगटे सॉल्ट, उमेळमान आणि राजिवली परिसरातील मिठागरांत पावसाचे पाणी भरले आहे. तेथे या पाहुण्या पक्ष्यांचे थवे खाद्याच्या शोधात आहेत.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

ऑगस्टमधील फ्लेमिंगोचे रूप मोहक असते. त्यांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची दरवर्षी येथे गर्दी होते. पाणथळ आणि मिठागरच्या जागी पाणगवतांचे कंद, शेवाळ, कीटक, अळ्या, शिंपले आणि खेकडे हे त्यांचे आवडते खाद्य आहे. ते शोधून त्यावर डल्ला मारण्यासाठी कलकलाट करीत फिरणाऱ्या फ्लेमिंगोमुळे येथील खाडीकिनारी गुलाबी रंगाच्या छटा उमटल्याचा भास होत आहे.

फ्लेमिंगो वक्राकार चोचीच्या साहाय्याने चिखलाचा तळ खरवडतात आणि मासे मटकावतात. चोचीच्या दाताळी भागात गाळलेले अन्न शिल्लक राहण्याची सोय असते. त्यामुळे खाद्यासोबत आलेले पाणी बाहेर पडते. विणीच्या काळात म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर वा फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान पाण्याच्या अनुकूल परिस्थितीनुसार ते कच्छमध्ये असतात. त्यानंतर ते वसईत ऑगस्टमध्ये येतात. सध्या वसईतील मिठागरांत राखी रंगाची त्यांची पिल्लेही दिसत आहेत.

‘फ्लेमिंगो राहिले पाहिजेत’

मिठागरांच्या जागा इंचाइंचाने कमी होत आहेत. वसई-विरार परिसरात बांधकामासाठी नवीन जागेचा अभाव यामुळे स्थानिक ‘बिल्डर लॉबी’ या मिठागरांच्या जागेवर डोळा ठेवून आहेत. मिठागरे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रस्तावही मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. परंतु जैवविविधतेच्या दृष्टीने सदर मिठागरे ही ना विकास क्षेत्रात ठेवण्याची मागणी पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी केली आहे.