शालीवाहन शके १९४० या हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी अवघे ठाणे सज्ज झाले असून चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागतयात्रांतून नववर्षांचा जल्लोष साजरा होणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्वच शहरांत एकापेक्षा अधिक ठिकाणी उद्या, रविवारी स्वागतयात्रा काढण्यात येणार असून त्याद्वारे मराठी संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. पण स्वागतयात्रा म्हणजे केवळ संस्कृतीचे दर्शन एवढेच समीकरण आता उरलेले नाही. यापुढे जात या मिरवणुकांमधून सामाजिक जागृतीचे भानही जपण्यात येते. या पाश्र्वभूमीवर ठाणे पट्टय़ातील वैशिष्टय़पूर्ण स्वागतयात्रांचा घेतलेला हा आढावा.

ठाणे

शोभायात्रा

  • कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे</li>
  • कौपीनेश्वर मंदिर, वेळ : सकाळी ७ वाजता

वैशिटय़े

  • ४० हून अधिक चित्ररथांचा सहभाग
  • शहरातील १७ वर्षे जुनी भव्य स्वागतयात्रा
  • जनव्यवस्थापन, राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बस, ऊर्जा फाऊंडेशनतर्फे टॅटू, कॅलीग्राफी, व्यास क्रिएशनचे वाचन चळवळ, कऱ्हाडे ब्राह्मण संस्थेतर्फे विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा जागर, भगिनी निवेदितातर्फे विस्मृतीतील खेळाचे प्रात्यक्षिक, मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे मोबाइल वाचनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे लॅबोरेटरी, मराठा मंडळातर्फे राष्ट्र आराधना, कोळीनृत्य, पर्यावरण जागृती या विषयावर आधारित चित्ररथ.

प्रमुख पाहुणे –

  • ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे

पूर्वसंध्येला कार्यक्रमाची मेजवानी

  • पूर्वसंध्येला शनिवारी दुपारी ४ वाजता जेलच्या तलावापासून सायकल रॅलीची सुरुवात होईल. शहरातील आंबेघोसाळे, मदारवे, सिद्धेश्वर, कचराळी तलावाला एक फेरी मारून मासुंदा तलाव येथे आगमन.
  • सायंकाळी ६ वाजता मासुंदा तलाव परिसरात बांधण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या व्यासपीठावर भारूड, कुचीपुडी नृत्य, ‘कर्मा एस्केप बँड फ्युजन साँग’ सादर करतील.
  • सायंकाळी ७.३० वाजता मासुंदा तलावातील मंदिरात महापौरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गंगा आरती त्याचबरोबर सायकलस्वारांनी आणलेले विविध तलावातील पाणी मासुंदा येथे अर्पण केले जाईल.
  • सायंकाळी ८ ते १० या दरम्यान मासुंदा तलाव परिसरात बांधण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या व्यासपीठावर राष्ट्रगीत, लोककलेचे कार्यक्रम.
  • सायंकाळी ६ वाजता न्यू इंग्लिश शाळेत संस्कार भारती रांगोळीबरोबरच वारली पेंटिंग आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असून छायाचित्राचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य स्वागत यात्रा मार्ग

सकाळी ६.४५ च्या सुमारास महापौरांच्या हस्ते शिवपूजन केले जाईल. त्यानंतर पंचांग वाचन करून ७ वाजता कौपीनेश्वर येथून पालखीसह शोभायात्रेस प्रारंभ होईल. ही पालखी बाजारपेठेतून जांभळी नाका, रंगो बापुजी चौक, समर्थ मंडळाची शाळा, महाराष्ट्र विद्यालय, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास सर्कल, नौपाडा पोलीस ठाणे, टेलीफोन एक्सेंज, समर्थ भांडार येथून राम मारुती पथ, मासुंदा तलाव येथून गडकरी रंगायतन येथून ही पालखी पुन्हा कौपीनेश्वर मंदिर येथे पोहचेल. न्यासातर्फे गडकरी रंगायतन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कळवा

गावदेवी कळवणदेवी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि कळवा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता गावदेवी मंदिर येथून पूजा करून पालखीच्या मिरवणुकीस सुरुवात होईल. त्यानंतर ज्ञानप्रसारक शाळा, शिवाजी चौक, मनीषानगर, सह्य़ाद्री पार्क, सुकुर पार्क या ठिकाणांहून स्वागतयात्रा मार्गक्रमण करीत गावदेवी मैदान या ठिकाणी शोभायात्रा येऊन पसायदानाने स्वागतयात्रेची सांगता करण्यात येणार आहे. या स्वागत यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा देखील भरवण्यात आल्या आहेत. तसेच आयोजन समितीतर्फे ५० फुटांची भव्यदिव्य रांगोळी देखील काढण्यात आली आहे. कळव्यातील विविध शाळा, सामाजिक संस्था, भजनी मंडळ यांचा सहभाग या स्वागतयात्रेत असणार आहे. शाळांतील मुले या स्वागतयात्रेत पौराणिक, ऐतिहासिक काळातील महापुरुषांच्या वेशभूषा साकारणार आहेत. विविध सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा देखील या स्वागतयात्रेत समावेश असणार आहे.

कोपरी

कोपरी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि कोपरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्ष स्वागतयात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या कोपरी गाव भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून सकाळी सात वाजता या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. ही स्वागत यात्रा पाणी वाचवा, वीज वाचवा असा संदेश, ऊर्जास्रोत वाचण्याचा संदेश, सौरऊर्जेचा वापर करणे या संकल्पनेवर आधारित असणार आहे. स्वागत यात्रेचा मार्ग हरिओमनगर, भाजी मार्केट, सिद्धार्थनगर, गावदेवी मंदिर, पै गल्ली, दौलतनगर, टीजेएसबी चौक, मंगला हायस्कूल, सुदर्शन कॉलनी, नारायण कोळी चौक, सिद्धिविनायक मंदिर असा असणार आहे.

डोंबिवली मुख्य स्वागतयात्रा

  • मुख्य आयोजक- श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली
  • प्रारंभ ठिकाण- गणेश मंदिर, वेळ, सकाळी ६.३० वाजता

स्वागतयात्रेची वैशिष्टय़े

  • डोंबिवली शहरातील २० वर्षे जुनी भव्य स्वागत यात्रा
  • यंदाच्या वर्षी शोभायात्रेमध्ये ६० हून अधिक चित्ररथांचा सहभाग असणार आहे.
  • यंदाच्या शोभायात्रा माझी अपेक्षा, माझी कर्तव्ये आणि डिजिटल इंडिया या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
  • संस्कार भारती संस्थेच्या वतीने यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी साकारणार आहेत.

स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम

  • शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता- रिदमिक योगासन आणि ट्रेडिशनल अ‍ॅरोबिक्स कान्होजी जेधे मैदान, भागशाळा मैदान, डोंबिवली (प.) येथे हा कार्यक्रम होईल.
  • सकाळी ७ वाजता – योगासने प्रात्यक्षिके व अभ्यास श्री गणेश संस्थान, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
  • सायंकाळी ५ वाजता- संभाजी महाराज बलिदान दिन शारीरिक प्रात्यक्षिके कान्होजी जेधे मैदान, भागशाळा मैदान, डोंबिवली (प.) येथे हा कार्यक्रम होईल.
  • रात्री ९ वाजता- ‘जगत्गुरू भारत’ कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी श्रोत्यांशी संवाद साधतील. अप्पा दातार चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.

स्वागतयात्रेचा मार्ग

सकाळी ६ वाजता डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानातून स्वागत यात्रेस सुरुवात होईल. सम्राट हॉटेल पं.दीनदयाल पूल मार्गे आई बंगला ते शिवमंदिर रोड, राजेंद्रप्रसाद रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड, अप्पा दातार चौकात स्वागत यात्रेचा शेवट होईल.

कल्याण

  • संयोजक – कल्याण संस्कृती मंच
  • संकल्पना – हिंदू धर्म संस्कृती सण व उत्सव परंपरा
  • चित्र रथ – ५०
  • यात्रेचा मार्ग – कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट, मुरबाड रस्ता, परळीकर वखार वळण रस्ता, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, पारनाका, लालचौकी ते नमस्कार मंडळ.

बदलापूर नववर्ष स्वागतयात्रा

  • वेळ : सकाळी ६.३० वाजता
  • बदलापूर पश्चिम गणेश चौक, मांजर्ली, मोहनानंदनगर, सर्वोदयनगर, बाजारपेठ (रेल्वे स्थानकाबाहेरून) हेंद्रेपाडा, बॅरेज रोड येथील उपयात्रा सहभागी होणार उड्डाणपूलवरून पूर्वेत कात्रप, शिरगाव, कुळगाव येथील उपयात्रा सहभागी होणार आहे.

कुळगाव सोसायटी

शिवाजी चौक – शिवाजी चौकातील उपयात्रा सहभागी होणार आहे. गोळेवाडी येथून हनुमान मारुती मंदिर, गांधी चौक येथे समारोप होणार आहे.

अंबरनाथनववर्ष स्वागतयात्रा

  • सकाळी ८ वाजता हेरंब मंदिर, खेर सेक्शन, शिवाजी चौक, शिवसेना शाखा या ठिकाणाहून हुतात्मा चौक येथे स्वागतयात्रा आयोजित केली आहे.
  • उपयात्रा पूर्व शिवसेना शाखा, वडवली येथून उपयात्रा दत्त मंदिर, शिवाजी चौक, हुतात्मा चौक येथे येणार आहे.