18 February 2020

News Flash

‘निवडक भाषाच बालसाहित्याने समृद्ध’

ते ठाण्यात ‘बोस्कीच्या गोष्टी’ या त्यांच्या मराठीत अनुवाद झालेल्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी बोलत होते.

भारतीय भाषांमध्ये मराठी, मल्याळम, बंगाली या भाषा वगळता अन्य कोणत्याही भाषेत विपुल बालसाहित्याची निर्मिती झालेली नाही, असे प्रतिपादन गीतकार गुलजार यांनी केले. ते ठाण्यात ‘बोस्कीच्या गोष्टी’ या त्यांच्या मराठीत अनुवाद झालेल्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र, कवी अरुण शेवते, डॉ. प्रदीप उप्पल, अभिनेत्री अमृता सुभाष, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जन्मापासून ऐकू न येणाऱ्या सान्वी माझरे या चिमुरडीला डॉ. उप्पल यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे ऐकू येऊ लागले, याच सान्वी माझरेच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

गुलजार यांच्या ‘बोस्की की कहानियाँ’ या हिंदीमध्ये लिहिलेल्या पुस्तकांपैकी नऊ पुस्तकांचा अनुवाद ग्रंथालीने मराठीत केला आहे. गुलजार यांची मुलगी मेघना ऊर्फ बोस्की हिच्या प्रत्येक वाढदिवशी तिला एक पुस्तक भेट देणारे गुलजार यावेळी तीच पुस्तके मराठीत अनुवादित झाल्याने प्रफुल्लित झाले होते. अभिनेत्री अमृता सुभाष व दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी या पुस्तकातील काही गोष्टींचे अभिवाचन केले.
या अभिवाचनातील ‘बोस्कीची सुनाली’ या अखेरच्या पुस्तकाने गुलजार यांच्यासह साऱ्यांनाच भावुक केले. यावेळी आपल्या खास शैलीत भावना विशद करताना गुलजार म्हणाले, माझ्या मुलीसाठी मी लिहिलेल्या या गोष्टी खऱ्या माझ्या नसून त्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या पंचतंत्राचा भाग आहेत. मात्र, मी त्या आजच्या जगाला कालसुसंगत पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांच्या शैलीत त्यांनी याला हिंदुस्थानी नमक लगाया है, असे सांगितले. पुढे ते आवर्जून म्हणाले की, ग्रंथालीने मराठीत इतक्या बोलक्या स्वरूपात ही पुस्तके आणली असून हिंदीतही इतके उत्कृष्ट बालसाहित्य मी पाहिलेले नाही. तसेच मराठी, मल्याळम, बंगाली या भाषावगळता अन्य कोणत्याही भाषेत विपुल बालसाहित्याची निर्मिती झालेली नाही. यावेळी उपस्थित शालेय मुलांचा वर्ग घेत त्यांना त्यांच्या ‘पुस्तक’, ‘चलते-चलते’, ‘माधव दौडो’ कविता ऐकवत आनंदित केले. तर ‘किताबें झाकती बंद अलमारी के शिसो से’ ही कविता ऐकवत त्यांनी उपस्थितांना स्तिमित करत कार्यक्रमाचा समारोप केला.

First Published on September 16, 2015 3:47 am

Web Title: gulzar visit at thane
Next Stories
1 प्रेमसंबंधातून महिला आयएएस अधिकाऱ्यास मारहाण
2 प्रतिकूल परिस्थितीतील ग्रंथसेवा
3 पांढरपोटय़ा नर्तक
Just Now!
X