News Flash

Video : डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी, महिलेलाही जबर मारहाण

रामनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

डोंबिवली शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होताना दिसत आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये डोंबिवली स्थानक परिसरात सोमवारी रात्री फेरीवाल्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत महिलेलाही जबर मारहाण झाल्यामुळे काहीकाळासाठी तणावाचं वातावरण पसरलं होतं.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर रामनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ४ दिवसांमधली डोंबिवलीत हाणामारी होण्याची ही दुसरी घटना असल्याचं बोललं जातंय. डोंबिवली स्थानक परिसरात अनेक अनधिकृत फेरीवाले विक्रीसाठी बसलेले असतात. अनेकदा नागरिकांनी याविरोधात महापालिकेत तक्रार देऊनही, प्रशासन याप्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 9:58 am

Web Title: hawkers group fight in dombivali near thane video goes viral psd 91
Next Stories
1 दिवाळीनिमित्त ठाणे, डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
2 बाजारावर मळभ!
3 शिवसेनेला शहरांची वाट बिकट
Just Now!
X