08 March 2021

News Flash

फेरीवाल्यांना २४ तासांची मुदत

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेने मोहीम उघडली आहे.

वसईमध्ये कारवाईला सुरुवात; बाजारपेठांमध्ये स्थलांतर करण्याचे पालिकेचे आदेश

रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना वसई-विरारच्या महापालिका आयुक्तांनी चपराक लगावली असून शुक्रवारी ‘फेरीवाले हटाव’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून प्रभागानुसार टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. अधिकृत फेरीवाल्यांना बाजारपेठात स्थलांतरीत करण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे, तर पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात झाली आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेने मोहीम उघडली आहे. शहरातील अधिकृत फेरिवाल्यांचे सव्‍‌र्हेक्षण पूर्ण झाले असून २० हजार अधिकृत फेरीवाल्यांना पालिकेच्या ४१ बाजारपेठांमध्ये हलविण्यात येणार आहे. शुक्रवारी या फेरीवाल्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या. त्यांना एक दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा बळजबरीने त्यांचे सामान जप्त करून हटविले जाईल, असे आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. संध्याकाळी विवा महाविद्यालयाच्या परिसरात बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले.  या कारवाईमुळे सर्व फेरीवाले एकत्र आले असून त्यांनी या कारवाईला शेवटपर्यंत विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

फिरते पथक

रस्त्यावर अनेक फेरीवाले आपापली दुकाने लावतात. संध्याकाळच्या वेळी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावल्या जातात. त्यांना एकदा हटविल्यानंतर ते पुन्हा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘फिरते पथक’ तैनात करण्यात येणार असून ते ही कारवाई करत राहणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेरीवाला मुक्त शहर’ हा आमचा संकल्प आहे. फेरीवाले हटविण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. टप्प्याटप्प्याने ती राबवली जाईल. यात कुणाच्या दबावाला बळी न पडता कारवाई केली जाणार आहे.

–  सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:27 am

Web Title: hawkers issue in vasai
Next Stories
1 ठाण्यात दोन शाळकरी मुलींनी अत्याचाराचा प्रयत्न उधळला
2 एलिट @ कोलशेत रोड, ठाणे (प)
3 थर आकाशी, नियम पायदळी!
Just Now!
X