राज्यातील आरोग्य विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पुन्हा एकदा एका नकोश्या कारणासाठी आरोग्य विभाग चर्चेत आला आहे. पालघरमध्ये आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात आरोग्य विभागाच्या दुरावस्थेचा अनोखा अनुभव आला. तपासणीसाठी एका आरोग्य केंद्रावर गेलेले एकनाथ शिंदे हे ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची अचानक तुटल्यामुळे शिंदे यांचा तोल गेला. सुदैवानं आजूबाजूच्या मंडळींनी त्यांना सावरल्यामुळं त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेनेच्या दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदेना रिक्त झालेल्या आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच शिंदे यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्याच्या उद्देशाने जव्हार तालुक्याला अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान शिंदे यांनी जव्हार तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या दाभेरी येथील आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. या आरोग्य केंद्रात ते ज्या खुर्चीवर बसले होती ती अचानक तुटली. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खुर्चीवरून पडत असतानाच त्यांना इतरांनी सावरले. या घटनेमुळे आरोग्य केंद्रांमधील वस्तुंच्या दर्जांवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिले आहे. आरोग्य केंद्रामध्ये खुर्चीची ही अवस्था असेल तर इतर सोयीसुविधांविषयी काय बोलणार अशी टिका सोशल मिडियावरुन होताना दिसत आहे.

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र
Urgent inspection of hospitals
देशभरातील रुग्णालयांची तातडीने तपासणी मोहीम; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उचलले पाऊल

या खुर्ची प्रकरणामुळे शिंदेंचा हा दौरा चर्चेत आला असला तरी या दौऱ्यामध्ये दूर्गम भागातील आरोग्य विषयक समस्या आणि गैरसुविधा आरोग्यमंत्र्यांनी स्वत: पाहिल्या. अनेक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा पत्ता नाही, परिचारिका नाहीत, रूग्णवाहिकांबद्दल तर न बोललेलेच बरे अशी एकंदरित परिस्थिती आहे. या दुर्गम भागातील समस्या तातडीनं सोडवल्या जातील, त्याचबरोबर आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदं लवकरात लवकर भरली जातील असं शिंदे यांनी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साखरेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचं आश्वासनही शिंदेंने यावेळी दिले. आरोग्य मंत्र्यांचा हा दौरा अचानकच ठरल्याने कोणालाच याविषयी माहिती नव्हती त्यामुळेच शिंदे यांना आरोग्य विषयक अनेक समस्या प्रत्यक्ष पाहता आल्या.