ठाण्यात ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’चे आयोजन
वाढते प्रदूषण, आहारातील बदल यांमुळे समाजातील आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस, वाढत असून या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्यसंदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आजार या विषयांवर या कार्यक्रमात वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ११ व १२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.बहुतेक विकारांचा संबंध आहाराशी असतो. त्यामुळे काय आहार घ्यावा, त्याचे प्रमाण, वेळापत्रक आणि त्याचा आरोग्याशी संबंध याविषयी प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य शैलेश नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहे. ‘आहारातून आरोग्य’ या विषयावर ते भाषण करतील. डॉ. राजेंद्र आगरकर हे ‘मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण’ या विषयावर तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे हे ‘ताणतणाव आणि आरोग्य’ या विषयावर विवेचन करणार आहेत.

प्रवेशिका कुठे?
३० रुपये प्रवेश शुल्क. आजपासून प्रवेशिका. लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) व टिप-टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते संध्या ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा.

’काय?
आरोग्यमान भव
’कधी?
११, १२ सप्टेंबर. (सकाळी ९ ते दुपारी २)
’कुठे?
टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)