News Flash

परिसंवाद, प्रदर्शनातून आरोग्याचा गुरूमंत्र, ठाण्यात ‘लोकसत्ता आरोग्यमान भव

आपल्याला उत्तम आरोग्य मिळावे, असे प्रत्येकालाच वाटत असते.

ठाण्यात ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’चे आयोजन
आपल्याला उत्तम आरोग्य मिळावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या आरोग्यविषयक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी आणि निरामय जीवनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आरोग्यसंदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आजार या विषयांवर या कार्यक्रमात वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ११ व १२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.बहुतेक विकारांचा संबंध आहाराशी असतो. त्यामुळे काय आहार घ्यावा, त्याचे प्रमाण, वेळापत्रक आणि त्याचा आरोग्याशी संबंध याविषयी प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य शैलेश नाडकर्णी हे मार्गदर्शन करणार आहे. ‘आहारातून आरोग्य’ या विषयावर ते संभाषण करतील. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि रक्तदाब यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळेच डॉ. राजेंद्र आगरकर हे ‘मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे हे ‘ताणतणाव आणि आरोग्य’ या विषयावर विवेचन करणार आहेत.

प्रवेशिका कुठे?
३० रुपये प्रवेश शुल्क. आजपासून प्रवेशिका. लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (प) व टिप-टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते संध्या ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा.

’काय?
आरोग्यमान भव
’कधी?
११, १२ सप्टेंबर. (सकाळी ९ ते दुपारी २)
’कुठे?
टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 6:56 am

Web Title: health talk with loksatta
टॅग : Loksatta
Next Stories
1 ठाण्यात विजेवर धावणाऱ्या बस!
2 अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले
3 संघर्ष समितीला भाजपचे साकडे
Just Now!
X