|| सागर नरेकर
नेरळ, कर्जतमध्ये ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस
बदलापूर : माथेरान, नेरळ, कर्जत या रायगड जिल्ह्यातल्या तसेच लोणावळा, भीमाशंकर या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. गुरुवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडून थेट बदलापूर शहर आणि कल्याण तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात अनुक्रमे १७०.७० आणि १४२.५० इतके मिलिमीटर पाऊस झाला. मात्र त्याचवेळी कर्जत येथे ३२१.८० तर माथेरान येथे ३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाही आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

गुरुवारी पहाटेपासूनच बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरूवात केली होती. उल्हास नदीची धोका पातळी १७.५०  मीटर असून सकाळच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी २१ मीटरवर पोहोचली होती. गुरुवारी मध्यरात्रीपासून बदलापूर आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर ओसरला होता, तर दुपारच्या सुमारास एखादी पावसाची सर येत होती. मात्र त्यानंतरही बदलापूर शहरात उल्हास नदीचे पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे पाऊस नसताना वाढत असलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्याचवेळी रायगड जिल्’ातील नेरळ, माथेरान, कर्जत तसेच लोणावळा, खंडाळा आणि भीमाशंकर परिसरात विœमी पाऊस झाल्याचे समोर आले. या पावसामुळेच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. रायगडच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २४ तासात माथेरान येथे ३३१.४० मिलिमीटर तर कर्जत येथे ३२१.८० इतका विœमी पाऊस झाला आहे, तर लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर या घाटमाथावरच्या भागातही सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने ते सर्व पाणी उल्हास नदीत येऊन मिसळले. त्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वेगाने वाढल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ तालुक्यात कमी पाऊस झाला असला तरी कर्जत आणि नेरळ भागात झालेल्या पावसामुळे उल्हास नदीने पुराची पातळी गाठल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली आहे.