News Flash

माळशेज घाटात दरड कोसळली

दरडीचा काही भाग थेट खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने चारचाकीच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले.

बदलापूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास माळशेज घाटात दरड कोसळली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका प्रवासाच्या चारचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरड छोटी असल्याने कल्याण-अहमदनगर मार्गाला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यामुळे या राज्यमार्गावरची वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

माळशेज घाटात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली तेव्हा मुंबईकडे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी माळशेज घाटात फेरफटका मारण्यासाठी बोगद्याच्या अलीकडच्या भागात आपली चारचाकी उभी केली होती. याच काळात डोंगरावरून एक दरड खाली कोसळली. दरडीचा काही भाग थेट खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने चारचाकीच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यावेळी आसपास कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 1:18 am

Web Title: heavy rainfall malshej ghat akp 94
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये शून्य करोनामृत्यू
2 मीरा-भाईंदरमधील ‘यूएलसी’ घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक
3 पावसाळी पर्यटनस्थळांवरील बंदीमुळे रोजगारावर गदा
Just Now!
X