21 September 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जोर धरला. कोपरी येथील एका इमारतीच्या संरक्षण भिंतीवर वृक्ष

मुसळधार पावसामुळे बुधवारी ठाणे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.        (छायाचित्र: दीपक जोशी)

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जोर धरला. कोपरी येथील एका इमारतीच्या संरक्षण भिंतीवर वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. तर पाऊ स आणि खड्डय़ांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेगही मंदावला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांतही पावसाचा जोर वाढला होता.

ठाण्यात बुधवारी १ वाजेपर्यंत  ४१. १४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कोपरी येथील बाराबंगला परिसरात एक झाड बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर उन्मळून पडला. ठाण्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने घोडबंदर परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर येथील कापूरबावडी, कासारवडवली येथे वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा परिसरातही पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना या कोंडीचा परिणाम जाणवला. तर भिवंडीतही ७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. काल्हेर, धामनकर नाका परिसरात काहीशी वाहतूक कोंडी झाली. शहरात ठिकठिकाणी मोठे खड्डेही पडले आहेत. तर दुपारी अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. तर कल्याणमधेही दुपारी १२ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला होता. तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाऊ स पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:53 am

Web Title: heavy rains in thane district zws 70
Next Stories
1 रुग्णालयांत रिकाम्या खाटांमध्ये वाढ
2 अतिसंक्रमित क्षेत्रात घरातच गणेश विसर्जन
3 कृत्रिम श्वसन यंत्रे डोंबिवली जिमखान्यात पडून
Just Now!
X