१ जानेवारी २०१९ पासून पुण्यात हेल्मेटसक्ती लागू केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी तसा निर्णयच जाहीर केला आहे. या निर्णयावर अनेक संस्थानी नाराजी व्यक्त केली असून त्याविरोधात ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अशातच सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना मंगळवारपासूनच म्हणजे २० नोव्हेंबरपासूनच हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.
हेल्मेटसक्तीच्या निर्णयाबाबत शिवाजी बोडके म्हणाले की, पुणे शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सर्वानी करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेता सरकारी कर्मचारी वर्गाने देखील हे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी,कर्मचाऱ्यांना उद्या मंगळवारपासूनच हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर उद्योग आणि संस्थांमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असून दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 9:40 pm