विक्रमगड तालुक्यातील केव येथील जि. प. बांगरचोळे शाळेच्या विद्यार्थांनी रक्षा बंधनातून  पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांंनी शाळेतच राख्या बनविल्या.  या बनविलेल्या राख्यांची गावात विक्री करण्यात आली.

व्यवहार ज्ञानाचे धडे प्रत्यक्षात विद्यर्थ्यांंना देण्यात आले. या राख्या बनविण्यासाठी विद्यर्थ्यांंनी धागा, मणी, कागद इत्यादि साहित्य पासून आकर्षक अशा राख्या बनविल्या. त्यातून तब्बल दोन हजार १५१ रुपयांची विक्री विद्यार्थ्यांंनी केली. राख्या बनविण्यासाठी फक्त ८० रुपये खर्च झाला असून २०७१ रुपयांचा नफा शाळेतील विद्यर्थ्यांंनी राख्यांपासून मिळविला.

या मिळालेले पैसे कोल्हापूरमधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दोन हजार १५१ रुपये हे मुख्यमंत्री मदत निधीत पाठवण्यात येणार आहेत. जि प शाळा बांगरचोळे शाळेतील विद्यार्थ्यांंकडून पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला गेल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी शाळेचे प्रमुख शिक्षक  बाळू गोटे व प्रकाश राव  यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले.