महाराष्ट्रातील एकटय़ा स्त्रियांच्या समस्यांचा आणि त्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनाचा वेध घेणारा ‘हिंदोळा – वास्तव परित्यक्तांचे’ हा माहितीपट डोंबिवलीकरांना पाहण्याची संधी  प्रतिमा फिल्म सोसायटीने उपलब्ध करून दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने येत्या रविवारी हिंदोळा हा माहितीपट व बंदिनी हा चित्रपट रसिकांना दाखविला जाणार आहे.