News Flash

समाजमाध्यमांवर एसटीचा इतिहास उलगडणार

राज्य परिवहन महामंडळाचा यंदा ७३ वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. त्या वेळेस महामंडळाचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर अधिकृत खाते सुरू करण्यात

एसटी प्रशासनाची वाहननामा मालिका

ठाणे : राज्य परिवहन सेवेच्या बसची निर्मिती कशी झाली, पहिली बस सेवा कोणत्या मार्गावर सुरू झाली, बसचे तिकीट भाडे किती होते आणि एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत दाखल झालेल्या बसचे मॉडेल, अशी सविस्तर माहिती राज्य परिवहन प्रशासनाने ‘वाहननामा’ मालिकेतून समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध केली आहे. प्रवाशांना एसटीच्या इतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर आता एसटीचा इतिहास उलगडणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा यंदा ७३ वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. त्या वेळेस महामंडळाचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर अधिकृत खाते सुरू करण्यात आले. या समाजमाध्यमांचा महामंडळाकडून प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात झाली आहे. एसटीचा डिजिटल संवाद या उपक्रमातून महामंडळ प्रवाशांशी संवाद साधणार असून त्यामध्ये महामंडळविषयक दैनंदिन घडामोडी, महत्त्वपूर्ण घटना, विशेष सूचना आणि मार्गदर्शन प्रवाशांना केले जाणार आहे. याशिवाय, एसटीचा १९४८ पासून ते आतापर्यंतचा इतिहास उलगडला आहे. त्यासाठी समाजमाध्यमांवर ‘वाहननामा’ मालिका महामंडळाने सुरूकेली आहे. एसटी बसची निर्मिती कशी झाली, पहिली बस कधी आणि कुठे तयार करण्यात आली, कोणत्या मार्गावर पहिली बस सेवा सुरू झाली, पहिली आराम आणि वातानुकूलित बस, पहिली कार्यशाळा, बस आसन क्षमता, बस पूर्वी किती भाडे आकारत होती, अशी संपूर्ण माहिती वाहननामा मालिकेतून प्रवाशांना देण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर काळानुरूप बदलत गेलेले एसटीचे रूपडे छायाचित्रासह प्रवाशांना समाजमाध्यमांद्वारे पाहता येणार आहेत. दरवर्षी राज्यातील अनेक भागांत विविध यात्रा भरविल्या जातात. त्या ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून एसटी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच एसटीची विविध ग्रामीण भागातील जुनी स्थानके, विशेष कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांविषयीची माहिती प्रवाशांना देण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:03 am

Web Title: history st revealed social media thane ssh 93
Next Stories
1 ठाण्यात दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात
2 मोबाइलचोरांमुळे रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू
3 ठाण्यातील जुन्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास?
Just Now!
X