उन्हाच्या काहिलीने आपले उग्ररूप धारण केले असून सकाळी दहा वाजल्यानंतर घरातून बाहेर पडणेही आता नकोसे होऊ लागले आहे. असे असले तरी दैनंदिन कामे, खरेदी आणि पोटापाण्यासाठी अनेकांना या काहिलीचा सामना करत कामे उरकावी लागतात. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर खुर्ची, टोपली, वर्तमानपत्र, स्कार्प, छत्री उपलब्ध असेल त्याच्या वस्तूच्या आधारे उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अनेक जण दुपारच्यावेळी चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा करून गारव्याचा सुखद अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. कुठे पक्ष्यांसाठी पाण्याची बाटली रिती केली जाते तर कुठे लहानगे थंड पाण्याच्या साहाय्याने शरीर भिजवून थंडीपणा मिळवण्याचा प्रयत्न करतात. उन्हाच्या काहिलीचे दर्शन घडवणारी चित्रमाला..