30 October 2020

News Flash

होम क्वारंटाइनचा रुग्ण रस्त्यावर फिरल्याने भाईंदरमध्ये खळबळ

होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आलेल्या एका युवकाने रस्त्यावर फेरफटका मारला.

प्रतिकात्मक छायाचित्र

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका युवकाने रस्त्यावर फेरफटका मारल्याने  भाईंदर पूर्व परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने हातावरुन हा शिक्का पुसून टाकला होता. भाईंदर पूर्व परिसरातील काशी नगरमध्ये परदेशातून आलेल्या या युवकाला अलगीकरण करुन ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती स्थानीय नगरसेविका तारा घरत यांना प्राप्त होताच त्यांनी प्रशासनाला कळवून इसमाला पालिकेच्या अलगीकरण कक्षात स्थलांतरीत केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

भाईंदर पूर्व येथील काशी नगर भागात राहणारा एक युवक नुकताच परदेशातून आला होता. त्याला होम क्वारंटाइन करून तसा शिक्का त्याच्या हातावर मारला होता. मात्र या इसमाने आपल्या हातावरील शिक्का मिटवून काल रात्री ९ ते ११ भाईंदर पूर्व परिसरात फेरफटका मारल्याचे समोर आले आहे.

या कालावधीत त्याने दूध, किराणा सामान, भाजीपाला आदी साहित्य घेतले. ही घटना समजताच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी ही माहिती पालिका आणि पोलिसांना आज सकाळी सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथील विलागिकरण कक्षात दाखल केले आहे. पोलीस आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 7:59 pm

Web Title: home quarantine patient on road tension in bhayandar dmp 82
Next Stories
1 आज मुंबई परिसरात अंक नाही
2 ठाण्यात दहापेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई
3 Video : नागरिकांचा परतीचा प्रवास; ट्रेनमध्ये तुडुंब गर्दी
Just Now!
X