वसई: शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात जागा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे. यासाठी कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, त्याची माहिती पालिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या १० हजारांवर गेली असून दररोज २०० ते ३०० रुग्णसंख्या वाढत आहे. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते. शहरात पालिकेने अधिग्रहित केलेले रिद्धिविनायक रुग्णालय असून १२ खाजगी रुग्णालये कोविडच्या उपचारासाठी मंजूर केली आहेत. मात्र कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाही.

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

रुग्णालयांमध्ये उपलब्ध क्षमता, उपचार सुरू असलेल्यांची संख्या, रिक्त खाटांची क्षमता, आयसीयू खाटा, जीवन रक्षा प्रणालीची उपलब्धता, डायलेसिस खाटांची उपलब्धता याची माहिती रुग्ण दाखल करण्यापूर्वी माहिती असणे खूप गरजेचे असते. रुग्ण दाखल करून घेण्यासाठी त्यांना विविध रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यासाठी विलंब लागत असल्याने रुग्णाच्या उपचारावरही परिणाम होत असतो. अशा रुग्णालयात किती खाटा आहेत त्याची माहिती पालिकेने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालयातील खाटांची उपलब्धता नागरिकांना व्हावी यासाठी संकेतस्थळावर डॅशबोर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण करून असा डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे.

– गंगाथरन डी. , आयुक्त, वसई-विरार महापालिका