29 January 2020

News Flash

हॉटेलमधील ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती चोरणारे वेटर अटकेत

ग्राहकांनी देयक देण्यासाठी कार्ड दिल्यानंतर हे वेटर कार्ड स्कॅन करून बनावट कार्ड तयार करायचे आणि त्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करायचे.

(संग्रहित छायाचित्र)

हॉटेलमध्ये देयकअदा करण्यासाठी डेबीट कार्ड देणाऱ्या ग्राहकांच्या कार्डाची माहिती चोरून पैसे लंपास करणाऱ्या विरारमधील तीन वेटरना विरार पोलिसांनी अटक केली आहे. ग्राहकांनी देयक देण्यासाठी कार्ड दिल्यानंतर हे वेटर कार्ड स्कॅन करून बनावट कार्ड तयार करायचे आणि त्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करायचे.

बदलापूर येथे राहणारे प्रसाद म्हसकर यांच्या खात्यातून अचानक ३३ हजार रुपये वजा झाल्याचा त्यांना संदेश आला. त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला असता हे पैसे बिहार मधून ऑनलाईन बँकिंगद्वारे वटविण्यात आल्याचे समजले.  त्यांनी विरार मधील एका हॉटेलमध्ये वेटरला बिल भरण्यासाठी एटीम कार्ड पिन नंबर सहित दिले होते. म्हणून त्यांनी विरार पोलिसांत तRार दिली आणि सारा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी विरार पोलिसांनी श्रेया हॉटेल मधील दोन आणि ए पी किचन या हॉटेल मधून एक अशा तिघा वेटरना अटक केली आहे. पोलीस तपासात या तिघांनी इतर अनेक जणांना फसविल्याचे समोर आले आहेत. सध्या पोलिसांनी चार ग्राकांची माहिती जमा केली असून त्यांना या चोरांनी जवळ जवळ ५० हजार रुपयाचा गंडा घातला आहे.

अनेक ग्राहक बिल भरण्यासाठी वेटरलाच डेबीट कार्ड देऊन आपला पिन नंबर देतात. हे वेटर अशा ग्राहकांचे कार्ड घेऊन गपचूप मोबाईलने ते स्कॅन करायचे. त्या आधारे त्यांचे साथीदार बनवाट डेबीट कार्ड बनवायचे. ग्राहकाचा पिन समजलेला असायचा त्यामुळे त्यांना इतर ठिकाणाहून पैसे काढणे सोपे जात होते. अशी कार्यपध्दती असणारी वेटरांची टोळी याप्रु्वी देखील शहरात कार्यरत होती. या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू असून ग्राहकांनी सावध रहावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी केले आहे.

First Published on September 12, 2019 2:56 am

Web Title: hotel customer debit card thief veter akp 94
Next Stories
1 तक्रारदाराकडूनच आरोपीचा शोध
2 तीन महिन्यांत ६३२ झाडे भुईसपाट
3 कळव्यात वृद्धेला लुटले
Just Now!
X