News Flash

डोंबिवलीतील खराब रस्त्यांबाबत हृदयनाथ मंगेशकरांचा संताप 

कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचता न आल्याने त्यांनी आल्या प्रेक्षकांकडे दिलगिरी व्यक्त केली. 

(संग्रहित छायाचित्र)

डोंबिवलीत परिसरातील रस्ते आधीपेक्षाही दयनीय अवस्थेत आहेत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केली.

खराब रस्त्यांविषयी संताप व्यक्त करून मंगेशकर यांनी स्थानिक प्रशासन यंत्रणेने या कामात लक्ष घालावे आणि लोकांना चांगले रस्ते कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी विनंतीही केली.

डोंबिवलीतील डॉ. रघुवीरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संध्याकाळी ८ वाजता हा कार्यक्रम होता. मानपाडा रस्त्यावरील माधवाश्रम सभागृह येथील या कार्यक्रमाला पं. हृदयनाथ आणि राधा मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला चारचाकीने येताना मंगेशकर यांना शिळफाटा, डोंबिवलीजवळ वाहतूक कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास त्यांना उशीर झाला. कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचता न आल्याने त्यांनी आल्या प्रेक्षकांकडे दिलगिरी व्यक्त केली.  तसेच खड्डे, रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला.

कल्याण, डोंबिवली परिसरांतील रस्ते, पूल महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहेत. या यंत्रणांचा रस्ते सुस्थितीत ठेवण्याबाबत एकमेकांशी वेळीच समन्वय होत नसल्याने त्याचा फटका वाहनचालक, लोकांना बसतो, अशी खंत या भागातील जाणकारांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:46 am

Web Title: hridaynath mangeshkars anger over poor roads in dombivali abn 97
Next Stories
1 गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत करू नका : राज ठाकरे
2 पुलाअभावी पादचारी बेजार!
3 बंदुकीचा धाक दाखवून २ लाख लुटले
Just Now!
X