ठाणे : जिल्ह्य़ात निर्बंध शिथिलीकरणानंतर सोमवारी बाजारपेठांसह सर्व आस्थापना सुरू होताच नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

एरवी सोमवारी बंद असणारी केशकर्तनालये सुरू होती आणि त्या ठिकाणी गर्दी होती. कामावर जाण्यासाठी अनेकांनी स्वत:च्या वाहनाने मुंबईतील कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. परिणामी ठाणे-बेलापूर, मुलुंड टोल नाका, शीळ फाटा मार्ग या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

गोखले रोड, राम मारुती रोड, मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील मॉलमध्ये तापमान तपासणीनंतरच प्रवेश दिला जात होता, मात्र फारशी गर्दी नव्हती. भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू होती. बाजारपेठांमध्येही झुंबड उडाली होती.  काही व्यायामशाळा सुरू झाल्या होत्या, पण त्या ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद होता. उद्याने, तलाव परिसर, मोकळे रस्ते अशा ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने आले होते. सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा नसतानाही  ठाणे स्थानकात तिकिटांसाठी रांगा लावल्या होत्या, मात्र त्यांना माघारी परतावे लागले.