भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनेखरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यासाठी खास मुहूर्तही आहेत. गुरुपुष्यामृत योग हा त्यापैकीच एक. यावेळी खरेदी केलेले सोने आपल्यासोबत कायम राहते, असे म्हटले जाते. मराठी कुटुंबांमध्ये हा मुहूर्त सहसा चुकवला जात नाही. मात्र यंदा ऐन दिवाळीत राबविण्यात आलेल्या ‘लोकसत्ता’च्या सुवर्णलाभ योजनेत ऐन गर्दीतही सोने खरेदीला उंदड प्रतिसाद लाभला, असे प्रतिपादन महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी केले. लोकसत्ता सुवर्णलाभ योजनेतील अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
‘सोनेखरेदी केले आणि ‘कार’सारखे बक्षीस जिंकण्याचा योग आला. हे पारितोषिक आमच्यासाठी अविस्मरणीय आहे,’ अशी भावना बोरिवलीचे विश्वनाथ तलवडेकर यांनी व्यक्त केली. सुवर्ण खरेदीदार ग्राहक, सुवर्णकार तसेच मान्यवर व्यावसायिक यांना एकत्र आणण्याचा सोनेरी क्षण ‘दिशा डायरेक्ट’ आणि ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळा’च्या सहकार्याने शुक्रवारी आला.  ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेत शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता. या योजनेत सहभागी झालेल्यांच्या प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने निवडलेल्या सोळा विजेत्यांना शुक्रवारी ठाण्याच्या ‘टिप-टॉप प्लाझा’मध्ये झालेल्या कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे उपाध्यक्ष अजित पेंडुरकर ‘ईशा टुर्स’चे संचालक आत्माराम परब, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार मंडळाचे सचिव व ‘लागू बंधू’चे संचालक दिलीप लागू, ‘सॅन्सुई ग्रुप’च्या व्यवस्थापक भक्ती शहा, ‘श्री नेमीनाथ ज्वेलर्स’चे चिंतन जैन, ‘एस. एम. म्हाप्रळकर ज्वेलर्स’चे मोहन म्हाप्रळकर, ‘शिवकीर्ती ज्वेलर्स’च्या स्वाती अनवेकर, ‘एल.डी. घोडके सराफ’चे सचिन घोडके, ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’चे मिलिंद आरोळकर, टिप-टॉपचे रोहितभाई शहा, तसेच मोहन ग्रुपचे रिजनल सेल्स मॅनेजर विजय पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ’ यांच्या सहकार्याने आयोजित आणि ‘दिशा डायरेक्ट’ची प्रस्तुती लाभलेल्या या कार्यक्रमाला योजनेत सहभागी झालेले सर्व सुवर्णकार उपस्थित होते.
‘सुवर्णलाभ’ योजनेला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि ही योजनाही खूप चांगली होती. ग्राहक स्वत:हून चौकशीसाठी येत होते. पण त्यांचा प्रतिसाद पाहता ही योजना आणखी काही दिवस वाढवली तर जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल,  कालावधी कमी असल्याने इच्छा असूनही उशिरा आलेल्यांना यात सहभाग घेता आला नाही. पण त्यांच्यासाठी आणखी महिन्याभरासाठी अशीच योजना ‘लोकसत्ता’ने राबवली तर निश्चितच फायदा होईल, अशा विविध प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिल्या.

विजेत्यांचा सन्मान
*  दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या बदलापूरच्या प्रतीक्षा जाधव. यांना ‘भूतान’ सहलीची सुवर्णसंधी मिळाली.
* तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या सायनच्या प्राजक्ता ठाकूर यांना ‘लडाख’ सहलीची संधी.
* चौथ्या क्रमांकाचे एलईडी टीव्ही हे पारितोषिक भांडुपच्या देवेंद्र गोसावी यांना मिळाले.
* पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी राजलक्ष्मी सावळे, मानसी आव्हाड यांना ‘एसी’चा लखलाभ झाला.
* सातव्या, आठव्या क्रमांकासाठी प्रतिमा साठे आणि देवेंद्र पाटील यांना एलईडी टीव्ही.
* वरळीच्या पुष्पा सोलवंडे, विलेपार्ले येथील दीपाली आचरेकर आणि ठाण्याच्या सीमा कोंडे यांना पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन, सुभाष मतकर आणि अभिजीत धामणकर यांना बक्षीस म्हणून ‘फ्रीज’ मिळाला
* मालाडच्या रुपाली महाडिकना एलईडी टीव्हीचे पारितोषिक, तर प्रभादेवीच्या सचिन भोसले आणि डोंबिवलीचे प्रसाद कोशे यांना होम थिएटरची भेट मिळाली.

*दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत आणि महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लो कसत्ता ‘सुवर्णलाभ’ योजनेचे आयोजन करण्यात आले होते. तर प्रायोजक ‘मोहन ग्रुप’ आणि ‘गुणाजी इंटरप्रायजेस’, प्लॅटिनम पार्टनर ‘लागू बंधू’ आणि ‘वामन हरी पेठे सन्स’, गोल्ड पार्टनर ‘सेन्को गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड’ आणि ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’, सिल्वर पार्टनर ‘चिंतामणीज’, ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’ आणि चिंतामणी ज्वेलर्स, डोंबिवली नागरी सहकारी बँक बँकिंग पार्टनर तर ईशा टूर्स या योजनेचे ट्रॅव्हल पार्टनर होते.