News Flash

मीरा रोडमध्ये हुक्का पार्लरवर छापा

घर भाडय़ाने घेऊन त्यात हुक्का पार्लर सुरू करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मीरा भाईंदर शहरातील हुक्का पार्लर विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्यानंतर हुक्का पार्लर चालकांनी पोलीस कारवाईतून वाचण्यासाठी आगळीच शक्कल लढवली आहे. घर भाडय़ाने घेऊन त्यात हुक्का पार्लर सुरू करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. मीरा रोडमधील हटकेश परिसरातल्या बहुमजली इमारतीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घालून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हटकेश येथील गौरव एक्सेलेन्सी या इमारतीच्या १४ व्या माळ्यावरील एका घरात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. या घरावर धाड घालून पोलिसांनी हुक्का तसेच सुगंधी तंबाखू जप्त केला. यावेळी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 3:29 am

Web Title: hukka parlor raid on mira road
Next Stories
1 ख्रिस्तायण : वसईतील प्रतिभावंत ख्रिस्ती साहित्यिक
2 गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा
3 गणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न
Just Now!
X