08 March 2021

News Flash

रुग्णवाहिकेला वाट न मिळाल्याने ठाण्यात महिला पोलिसावर हल्ला

या वेळी त्याने महिला पोलिसाला शिवीगाळही केली

सिग्नलमुळे रुग्णवाहिकेला वाट न मिळाल्याने आत बसलेल्या रुग्ण महिलेच्या पतीने समोर उभ्या असलेल्या वाहतूक विभागातील महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाण्यातील कॅडबरी जंक्शनजवळ शनिवारी घडला. या प्रकाराने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

धक्काबुक्की केल्यानंतर रुग्णवाहिकेतील व्यक्तीने महिला पोलिसाला गाडीपर्यंत ओढत नेले व तिला त्याच्यात बसवून ती ज्युपिटर रुग्णालयापर्यंत नेली. या वेळी त्याने महिला पोलिसाला शिवीगाळही केली. वाहतूक कोंडीमुळे रुग्ण महिलेच्या पतीने स्वत:वरील नियंत्रण गमावल्याने हा प्रकार घडल्याने रुग्णालयात डॉक्टरांवर संताप व्यक्त करण्याबरोबरच पोलिसांनाही लक्ष्य केले जात असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. महिला पोलिसाशी गैरवर्तणूक केल्यावरून पीडित पोलीस कर्मचाऱ्याने वर्तकनगर ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 7:32 am

Web Title: hurdles in ambulance road cause to slap police
Next Stories
1 लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर चार महिने बलात्कार
2 आरोग्याच्या समस्यांवर चर्चा, परिसंवादातून उपाय
3 नियमांच्या उल्लंघनाचे थरावर थर
Just Now!
X