News Flash

घरगुती वादातून पत्नीची केली हत्या… नंतर रेल्वेखाली दिला जीव

पालघरमधील धक्कादायक घटना

घरगुती वादातून राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर धावत्या रेल्वेखाली उडी देऊन आपले जीवन संपवल्याचा प्रकार पालघरम बोईसर पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. बोईसर जवळील सरावली त्रिवेदी नगर येथे महेंद्र यादव त्याची पत्नी माधुरी व दोन मुलांसह राहत आहेत. या दोन दोघाही पती-पत्नीमध्ये मंगळवारी रात्री घरगुती वादातून भांडण होऊन मोठा वाद उफाळून आला होता.

या घरगुती वादाच्या रागात महेंद्र याने मध्यरात्रीनंतर पत्नी माधुरीला धारदार चाकूने भोसकून तिचा खून केला, अशी माहिती बोईसर पोलिसांनी दिली. तिचा खून केल्यानंतर तो तेथून निघून गेला व एका धावत्या रेल्वे गाडीखाली उडी देऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 5:18 pm

Web Title: husband killed wife and commits suicide bmh 90
Next Stories
1 करोना कराल : महामुंबईची करोना‘वाट’
2 ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रातच निर्बंध
3 नियम न पाळल्यास कठोर र्निबध
Just Now!
X