01 October 2020

News Flash

अनैतिक संबंधाच्या रागातून हत्या

काही दिवसांपूर्वी वसईच्या वालीव पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून त्याला अडकविण्यासाठी पतीने तिऱ्हाईताचाच खून केल्याची घटना उघड झाली आहे.

काही दिवसांपूर्वी वसईच्या वालीव पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने १७ वार करण्यात आले होते. तसेच त्याच्या खिशामध्ये विनय यादव असे नाव असलेले कीचेन आणि त्याच नावाचे भेटकार्ड (व्हिजिटिंग कार्ड) सापडले होते. यावरून पोलिसांनी यादवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा या खुनाशी काहीही संबंध नसल्याचे आढळले होते. तसेच मृताची ओळखही पटत नसल्याने वालीव पोलीस चक्रावून गेले होते.

यादवकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने एका महिलेशी लग्न केल्याचे समजले. तसेच तिचा पती रिंकू ऊर्फ अश्विनीकुमार श्रीवास्तव याच्याशी वाद असल्याचेही समोर आले. रिंकू हा हत्येच्या एका प्रकरणात तुरुंगात असताना  त्याच्या पत्नीचे सूत जुळले होते. यावरून पोलिसांनी श्रीवास्तवला ताब्यात घेतले.

पत्नीला पळवून नेल्याने तिचा यादव याला अडकविण्यासाठी पांडू या भाजीविक्रेत्याला काम मिळवून देण्याच्या आमिषाने नायगाव येथे आणले. त्यानंतर त्याला दारू पाजून खून केल्याचे त्याने कबूल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:23 am

Web Title: husband kills wife boyfriends in vasai
Next Stories
1 कोपरीकरांवर सुविधांचा वर्षाव!
2 म्हाडाच्या भूखंडावर वाहनतळ
3 पालिकेच्या घंटागाडय़ांची बेकायदा वाहतूक
Just Now!
X