News Flash

जीन्स आणि टी-शर्ट घातल्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोंबिवलीतला तरुण अटकेत

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे

संग्रहित, प्रतीकात्मक छायाचित्र

पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते म्हणून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न डोंबिवली या ठिकाणी झाला आहे. सुजाता जाधव असं महिलेचं नाव असून तिचा पती सुधीर जाधवने तिला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर गळा आवळून तिला ठार करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सुधीरला अटक केली आहे.

सुधीर आणि सुजाता जाधव हे दोघेही डोंबिवलीजवळ असलेल्या कोपर परिसरात वास्तव्य करत होते. या दोघांमध्ये कायम वाद होत असत. पत्नी सुजाता जीन्स आणि टी शर्ट घालते या गोष्टीला सुधीरचा विरोध होता. त्याने बऱ्याचदा तिला असे कपडे घालू नकोस असे सांगितले होते. एवढंच नाही तर सुजाता फेसबुकवर जे चॅट करत असे त्यावरही सुधीरचे लक्ष होते. मित्रांशी चॅट करु नकोस असे सुधीरने सुजाताला बजावले होते. मात्र या गोष्टींवरुन त्या दोघांमध्ये कायम खटके उडत. अखेर हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात सुधीरने सुजाताला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबला. गळा दाबल्याने सुजाता बेशुद्ध झाली.

सुजाता शुद्ध हरपल्यावर सुधीरला वाटले की तिचा मृत्यू झाला. ज्यानंतर सुधीर स्वतःहून रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजाताला आधी डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सुजाताला सायन रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 8:26 pm

Web Title: husband try to killed his wife becasuse she wear jeans and t shirt in dombivali scj 81
Next Stories
1 भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात पाच वर्षाची शिक्षा
2 अपंग, विशेष मुलांची उपेक्षा
3 नगरविकास कार्यालयात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी
Just Now!
X