कल्याण : कल्याणमधील रेतीबंदर खाडीकिनारी जिल्हा प्रशासनाने १० लाख रुपयांचा अवैध वाळूसाठा आणि सात लाख रुपयांहून अधिक किमतीची यंत्रसामुग्री जप्त केली. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव रेतीबंदर, कोपर, भिवंडी ग्रामीण खाडीकिनारी हद्दीत अशाप्रकारे अवैध वाळूउपसा सुरू असून, तेथील वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीबंदर दुर्गाडी भागात दिवस-रात्र मोठय़ा प्रमाणात सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करून ती बेकायदा बांधकामे करणाऱ्या माफियांना विकली जाते. या बेकायदा वाळू उपशाची माहिती अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने रेती गटाचे जिल्हाधिकारी मुकेश पाटील, कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना माफियांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

stamp duty
सरकारच्या ‘या’ योजनेची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

महसूल विभागाचे अधिकारी शनिवारी दुपारी कल्याण रेतीबंदर खाडीकिनारी पोहोचले तेव्हा त्यांना खाडीतून उपसा केलेला ३० ब्रास (१० लाख रुपये किमतीचा) रेती साठा आढळून आला. या ढिगाजवळ वाळूने भरलेला एक ट्रक उभा होता. महसूल अधिकाऱ्यांनी खाडीकिनारच्या हौद्यात जमा केलेले वाळूचे ढीग पोकलनेच्या साहाय्याने खाडीत लोटून दिले. तेथील सक्शन पंप, इंजिन अशी सात लाख रुपयांची यंत्रसामुग्री जप्त केली. वाळूवर हक्क सांगण्यासाठी तेथील एकही माफिया पुढे आला नाही. त्यामुळे वाळूवाहू ट्रकचालक आणि मालकाविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

३० ते ३५ हजारांना विक्री..

’ डोंबिवली मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी माफिया रात्रंदिवस रेती उपसा करून वाळू कल्याण डोंबिवली पालिकेच्या मोठागावमधील मलउदंचन केंद्राजवळील मोकळ्या जागेत, तसेच इमारतींच्या आडोशाला लपून ठेवतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाळूचे ट्रक शहराच्या विविध भागांत विक्रीसाठी नेतात. एक ट्रक वाळू सुमारे ३० ते ३५ हजाराला विकली जाते.

’ वर्षभरात महसूल विभागाने जिल्ह्य़ात १२ ठिकाणी वाळू माफियांवर कारवाई केली. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ४७ सक्शन पंप, ३७ बार्ज, १० बोटी, एक क्रेन जप्त आणि काही साधने नष्ट करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रेती उपसा सुरू असताना पोलीसही बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.