24 February 2021

News Flash

बदलापूरच्या जंगलात सापडला गुप्तांग कापलेल्या अवस्थेतील मृतदेह

बदलापूरच्या जंगलात गुप्तांग कापलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बदलापूरच्या जंगलात गुप्तांग कापलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ३० ते ४० वयोगटातील आहे. मृतदेहावर भोसकल्याच्या अनेक खूणा आहेत तसेच दातही तुटलेले आहेत.

चिंचावली गावातील मोतीराम गावांडा हे मंगळवारी सकाळी पिंपळादाराच्या जंगलातून जात असताना सर्वप्रथम त्यांच्या नजरेस हा मृतदेह पडला. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

बदलापूर पोलिसांनी तपास सुरु केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सूड भावनेतून अत्यंत क्रूर पद्धतीने या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:13 pm

Web Title: in badlapur forest body found with private parts cut off
Next Stories
1 पाणीकपात  ‘जैसे थे’
2 शिक्षिकेवर बलात्कार; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक
3 शीतपेयांची तपासणी कागदावरच
Just Now!
X