News Flash

ब्रह्मांड कट्टय़ावर ‘कटय़ार काळजातील सूर’ उमटले

ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे ब्रह्मांड कट्टय़ावर  नुकताच ‘कटय़ार काळजातील सूर’ हा कार्यक्रम नितीन श्री व मंजूषा भावे यांनी नाटय़संगीत गाऊन सादर केला. यावेळी ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

नमन नटवरा विस्मयकारा या नांदीने गाण्याला सुरूवात झाली. त्यानंतर नितीन श्री यांनी जमुना किनारी मेरो गाव सावरे आयी जैय्यो हे बहारदार गीत सादर केले. त्यानंतर कटय़ार काळजात घुसली या चित्रपटातील घेई छंद मकरंद हे गीत गाऊन नितीन श्री यांनी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर हरवले मधुमुरलीचे सूर हे नाटय़ संगीत मंजूषा भावे यांनी सादर केले. यावेळी राधा धर मधु मिलिंद जय जय, सुहास तुझे मनास मोही मी मज हरवून बसले ग, गर्द सभोवती रान साजणी, सजना का धरला परदेस, सोहम हर डमरू बाजे, काटा रुते कुणाला आदी गाणी सादर झाली. या कार्यक्रमात शिषीर पाटणकर यांनी संवादिनीची तर अक्षय कुबल यांनी तबल्याची साथ दिली. राजेश शिंदे यांनी निवेदन केले.

यावेळी ब्रह्मांड कटटय़ावर अभिनेत्री रागिणी सामंत यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:40 am

Web Title: in brahmand present katyar kaljat songs
Next Stories
1 माजी महापौर शाहू सावंत यांचे निधन
2 मुंब्रा, दिव्यात महावितरणचे छापे
3 महापौर चषक चित्रकला स्पर्धा
Just Now!
X