X

ठाण्यात बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला

ठाण्यातील मानपाडा परिसरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक बालरोग तज्ज्ञ जखमी झाले आहेत.

ठाण्यातील मानपाडा परिसरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक बालरोग तज्ज्ञ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री घडली. प्रशांत दरंदले असे जखमी डॉक्टरांचे नाव आहे. हल्ल्यानंतर डॉ. दरंदले यांना त्वरीत ठाण्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डॉ. प्रशांत दरंदले हे बालरोग तज्ज्ञ आहेत. घराबाहेरच अज्ञात व्यक्तींनी डॉ. दरंदले यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. दरंदले हे जखमी झाले. हल्ल्यामागचे कारण स्पष्ट नाही. पण रूग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.