17 January 2021

News Flash

मीरा-भाईंदरमध्ये मूर्ती स्वीकृती  केंद्राला नागरिकांचा प्रतिसाद

पाच दिवसांचे १७३८ तर सात दिवसाचे ६३८ गणपतींचे विसर्जन

पाच दिवसांचे १७३८ तर सात दिवसाचे ६३८ गणपतींचे विसर्जन

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात पाच दिवसांच्या १ हजार ७३८ आणि सात दिवसांच्या  ६३८ गणेशमूर्तींचे विसर्जन स्वीकृत केंद्रावर झाले.

नागरिकांना गणेश विसर्जन करणे सोयीस्कर व्हावे यासाठी महापालिका प्रभाग १ मध्ये तीन ठिकाणी, प्रभाग २ मध्ये ६ ठिकाणी, प्रभाग ३ मध्ये १३ ठिकाणी , प्रभाग ४ मध्ये  १६ ठिकाणी, प्रभाग ५ मध्ये ४ ठिकाणी ,प्रभाग ६ मध्ये ९ ठिकाणी अशा एकूण ६  प्रभागांमध्ये ५१ ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र तयार केले होते.

त्यानुसार पाच दिवसांच्या घरगुती १५६३, सार्वजनिक १० तर १६५ गौरी-गणपतीचे विसर्जन स्वीकृत केंद्रावर झाले. त्याचप्रमाणे सात दिवसांच्या घरगुती ६०५ आणि सार्वजनिक  ३३ गणपतीचे विसर्जन स्वीकृत केंद्रावर झाले.त्यामुळे दोन  दिवसांत एकूण २३७६ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 3:44 am

Web Title: in mira bhayander city 1738 idols of five days and 638 ganesh idols of seven days immersed zws 70
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यात आणखी १,२१२ रुग्ण
2 सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर…, बॅनरबाजीमधून काँग्रेसचा प्रश्न
3 ठाणे जिल्ह्य़ात १,४०६ नवे रुग्ण
Just Now!
X