17 November 2019

News Flash

नवी मुंबईत व्यापाऱ्याची भररस्त्यात गोळया झाडून हत्या

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर सहा मधील व्यापारी शांताराम कुटाळ यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे.

प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर सहा मधील व्यापारी शांताराम कुटाळ यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने एकाच खळबळ उडाली  आहे. ज्यांची हत्या करण्यात आली त्या कुटाळ  यांचा दुधे चौकात गाड्यांच्या बॅटरी विकण्याचा व्यवसाय होता. बुधवारी रात्री १० वाजता दुकान बंद करून जात असताना चौकातच त्यांची हत्या करण्यात आली.

आरोपीने शांताराम कुटाळ यांना पहिले चाकूने भोसकले त्यानंतर दोन गोळ्या त्यांची हत्या केली. ही हत्या व्यावसायिक कारणावरून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कोमोठे पोलीसांनी वर्तवला आहे. दरम्यान गोळ्या झाडल्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

First Published on July 5, 2018 2:26 am

Web Title: in navi mumbai trader shot dead