News Flash

वसई-विरार मध्ये विवा होम्सच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी

संचालकांच्या कार्यालयाच्या बाहेर एसआरपीचे जवान तैनात

वसई-विरार मध्ये आज सकाळ पासून ईडीचे धाड सत्र सुरू झाले आहे. वसईतील नामांकित विकासक विवा होम्सच्या कार्यालयावर आणि संचालकांच्या घरी धाडी पडल्याची माहिती समोर आली आहे.

संचालकांच्या कार्यालयाच्या बाहेर एसआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. प्राथमिक माहिती नुसार, HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवाण यांनी ईडीच्या चौकशीत त्यांनी विवा ग्रुप त्यांचा भागीदार असल्याचे म्हटले होते.

तसेच प्रवीण राऊत यांच्या चौकशीत विवा ग्रुपचे व्यवहार असल्याचे समोर आले होते. या धर्तीवर ही कारवाई होत असल्याचे समजले आहे. पण या बाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:29 pm

Web Title: in vasai virar ed raid on viva home offices dmp 82
Next Stories
1 पालिकांची कोट्यवधींची पाणी थकबाकी
2 कोपरी पुलासाठी पुन्हा वाहतूक बदल
3 बेकायदा वाहन पार्किंगच्या दंडात वाढ
Just Now!
X