07 July 2020

News Flash

बदलापूर करोना केंद्रात गैरसोयी कायम

अपुऱ्या सुविधांबाबत रुग्णांचे समाजमाध्यमांतून प्रकटीकरण

अपुऱ्या सुविधांबाबत रुग्णांचे समाजमाध्यमांतून प्रकटीकरण

बदलापूर : करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच धूळ खात पडलेल्या सोनिवली येथील गृहप्रकल्पात बदलापूर नगरपालिकेने करोना काळजी केंद्र सुरू केले. मात्र, सुरुवातीपासूनच येथे समस्या आहेत. सातत्याने रुग्ण त्याविषयी समाज माध्यमांतून त्याची माहिती देत आहेत. नुकत्याच दाखल झालेल्या एका महिला रुग्णाने येथील अस्वच्छता, आहाराचे वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी उघड केली.

मे महिन्यात सोनिवली येथे धूळ खात पडलेल्या बीएसयूपी गृहप्रकल्पात हे केंद्र सुरू करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचे उद्घााटन केले. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतरच येथे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने कसेबसे येथे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले. मात्र त्यानंतरही या केंद्राच्या समस्या कायमच आहेत. अस्वच्छता, पाणी, जेवणाच्या वेळा अशा अनेक समस्यांबाबत खुद्द रुग्णांनी फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांच्या मदतीने आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा येथील अस्वच्छता, आहाराचे वेळापत्रक आणि रुग्णांची होणारी हेळसांड समोर आली आहे. एका महिला रुग्णाने याबाबतची सविस्तर माहिती समाजमाध्यमांत प्रसारित केली आहे. रुग्णाला येथे दाखल केल्यानंतर ज्या खोलीत ठेवले जाते त्या ठिकाणी कोणतीही स्वच्छता नाही. येथील साफसफाई रुग्णालाच करायला सांगण्यात येते. आहाराचे वेळापत्रकही दररोज बदलते. त्यामुळे अधिक वयाच्या रुग्णांना त्रास होत आहे.

पीपीए किट नसल्याने अनेकदा डॉक्टर रुग्णांना तपासण्यासाठी जात नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी होत नाही. फोनवरून रुग्णांची माहिती घेऊन त्यांना औषधे दिली जातात, असे अनेक धक्कादायक प्रकार सदर महिलेने समोर आणले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्यानेही डॉक्टर सहसा तपासण्यासाठी येत नसल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:13 am

Web Title: inconvenience persists in badlapur corona center zws 70
Next Stories
1 अत्यावश्यक कामाच्या नावाखाली मोबाइल मनोऱ्यांची उभारणी
2 ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरे टाळेबंदीतच
3 कचरावेचकांचे आरोग्य धोक्यात
Just Now!
X